You are currently viewing राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध….

राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध….

राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या उत्तरप्रदेश सरकारने पोलिसांकरवी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहिर निषेध करतो, असे वक्तव्य सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी केले आहे
उत्तरप्रदेश मध्ये हाथरस येथे एका 19 वर्षाच्या मुलीवर निर्दयीपणे सामुहिक बलात्कार करून तिची जीभ कापली जाते आणि ती असंख्य मरणप्राय वेदना सहन करत मृत्यूला कवटाळते अशा परिस्थितीत गुंडाना व बलात्का-याना प्रोत्साहन देणारे उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे एरव्ही टॅवटॅव करणारे सोकाॅल्ड नेते मुग गिळून गप्प आहेत आहेत अशा परिस्थितीत त्या पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांतवन करण्यासाठी हाथरस येथे जात असताना काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस आदरणीय श्रीमती प्रियांका गांधी याना अडवून पोलिसांच्या वेषातील उत्तरप्रदेश सरकारच्या गुंडानी आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्याबरोबर जे अशोभनिय वर्तन केले त्याचा मी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहिर निषेध करतो. अशा प्रकारची गुंडगीरी व हुकुमशाही या देशात चालवून घेतली जाणार नाही. या देशातील जनता लोकशाही व संविधानाला मानणारी आहे. म्हणूनच या देशातील जनता या हुकुमशाही व गुंडगीरी करणा-या व बलात्का-याना प्रोत्साहन देणा-या भाजपच्या उत्तरप्रदेश सरकारला व भाजपच्या केंद्र सरकारला या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =