You are currently viewing विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे शिवविचार सोहळा संपन्न

विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे शिवविचार सोहळा संपन्न

*श्री जयंत जावडेकर, सहा. आयुक्त नवी मुंबई महापालिका यांचे लाभले मार्गदर्शन*

 

सावंतवाडी :

नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये शिव विचार रुधावेत व मुलांना वाचन संस्कृतीचे आवड लागावी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने श्री निखिल नाईक आणि आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.निलेश उर्फ बाळा परब यांच्या संकल्पनेतून श्री.निखिल आनंद नाईक, संदेश देऊलकर, व देवेंद्र कुबल पुरस्कृत शिव विचार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात आरोस केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमधील १७ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तीन गटात विभागून ही स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवी मुंबई महापालिका सहा.आयुक्त श्री जयंत जावडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवविचार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. श्री जयंत जावडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. शाळेच्या मुलांनी अतिशय सुरेल आवाजात छ.शिवाजी महाराजांच्या आरतीचे गायन करून पंचदीपांनी ओवाळले, त्याचप्रमाणे स्फूर्तिदायी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.धुपकर यांनी शीवविचार मांडले व उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.जयंत जावडेकर यांनी मुलांना अतुलनीय असे मार्गदर्शन केले. गेली दोन वर्षे शिवविचार सोहळ्याचे आयोजन विद्याविहार इंग्लिश स्कूल येथे करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते निखिल नाईक यांनी स्पर्धेविषयी मुलांना सविस्तर माहिती देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

*एकूण १७ स्पर्धकांनी घेतला वकृत्व स्पर्धेत सहभाग*

गेली दोन वर्षे विद्या विहार इंग्लिश स्कूल येथे शिवविचार सोहळा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत एकूण १७ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तीन गटात विभागून सदर स्पर्धा पार पडली. यात १ ली ते ४ थी गटात प्रथम कु.रिया मनोज खरात, द्वितीय तन्वी रूपेश मोरजकर, तृतीय कु.वैदेही हेमंत कामत, ५ वी ते ७ वी गटात प्रथम कुमारी अन्वी मुकुंद धारगळकर, द्वितीय सिद्धी मनोज खरात, तृतीय सिद्धी सतीश मोरजकर व ८ वी ते १० वी गटात प्रथम निधी गणेशप्रसाद भट, द्वितीय प्राची मदन मुरकर, तृतीय सृष्टी संतोष नाईक यांनी क्रमांक पटकावले. विजेत्यांना रोख बक्षीस, शिव प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत आरोही पडते, जान्हवी नाईक, विरा परब, गंगाराम मुळीक, प्रतीक गावडे, आरंभ गावडे, आरोही जोशी, गौरव साटेलकर आदींनी भाग घेतला होता. सहभागी सर्वांना आरोस गावचे ज्येष्ठ लेखक आप्पा परब यांनी लिहिलेले ऐतिहासिक पुस्तक भेट देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी येथे राहणारे मूळ आरोस गावचे सुपुत्र लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) व पत्रकार रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांनी केले. आपल्या मनोगतात प्रवीण मांजरेकर यांनी मुलांनी यू ट्यूब वरील भाषणे कॉपी पेस्ट न करता वाचन करून मार्गदर्शन घेऊन स्वलिखित भाषणे करावी असे सूचित केले.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती सुषमा मांजरेकर यांना तर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी व राज्य कलाध्यापक संघटनेचा आदर्श पुरस्कार प्राप्त श्री.विवेकानंद सावंत सरांचा देखील आरोस परिवर्तन समूहाकडून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नवी मुंबई महापालिका सह.आयुक्त जयंत जावडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जयंत जावडेकर – सहा. आयुक्त नवी मुंबई महानगर पालिका, निलेश परब – अध्यक्ष आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, सदाशिव धुपकर – मुख्याध्यापक विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस, संदेश देऊलकर, संदीप नेमळेकर, माजी पंचायत समिती सदस्य, आनंद नार्वेकर, निलेश देऊलकर सहा.शिक्षक, महादेव पांगम – उपाध्यक्ष, हेमचंद्र सावळ उपाध्यक्ष, शांताराम गावडे- सचिव, नारायण मोरजकर- खजिनदार,गजानन परब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, कमिटी सदस्य संतोष फणसेकर, श्री.पाटकर, इतर शाळांचे शिक्षक, पालक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निलेश देऊलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 11 =