You are currently viewing इंधन बचत ही काळाची गरज – दयानंद मागले

इंधन बचत ही काळाची गरज – दयानंद मागले

देवगड आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रम संपन्न

देवगड

इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचतीमुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडते त्याचबरोबर राष्ट्रीय इंधन बचतीस हातभार लागतो.चालकांनी आपली सेवा बजावीत असताना प्रवासी चढउतार करताना गाडी चालू बंद करणे.तसेच योग्य त्या ठिकाणी आवश्यक त्या गिअरचा वापर करणे गरजेचे आहे .कार्यशाळा कर्मचारी यानी गाडीच्या इंजिनाची देखभाल दुरुस्ती वेळीच केली तर त्याचाही फायदा इंधन बचत करण्याकरिता होईल .असे प्रतिपादन विशेष कार्यकारी अधिकारी तथा पत्रकार दयानंद मांगले यांनी देवगड आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रम शुभारंभ सोहळ्यात बोलताना केले.

या निमित्ताने संप दुखवटा कालावधीनंतर सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचे स्वागत करून इंधन बचत पंधरवडा कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रापम देवगड आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रजवलनाने विशेष कार्यकारी अधिकारी तथा पत्रकार दयानंद मांगले यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रभारी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर सहा. वहातुक निरीक्षक लवू सरवदे,सहा.कार्यशाळा अधीक्षक धाकू तांबे लेखाधिकारी श्रीकांत शेळके ,हेड मेकेनिक धाकू तांबे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.या निमित्ताने प्रभारी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर,धाकु तांबे,लवू सरवदे,यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.सुत्रसंचालन आभार प्रवीण तिरलोटकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा