You are currently viewing कणकवलीत तालुक्यातील शिवडाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व..

कणकवलीत तालुक्यातील शिवडाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व..

कणकवली :

 

तालुक्यातील शिवडाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक किरण गावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत श्री देव लिंगेश्वर ग्रामसेवा पॅनलने शिवसेना पॅनलच्या पराभव करत सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला आहे. उद्योजक किरण गावकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजप उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवत शिवडाव सोसायटी निवडणुकीत इतिहास रचला आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा भिसे यांचे आवाहन संपुष्टात आणत किरण गावकर यांनी एकहाती विजय मिळवून दाखवला आहे. आज झालेल्या मतमोजणीनंतर भाजपा पुरस्कृत पॅनलचे १३ उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी किरण गावकर, दिलीप गावकर, मिलिंद गावकर, तुकाराम पवार, लवू वाळके, अशोक जाधव, प्रियांका सावंत, सुरेश बोडेकर, बाळकृष्ण मे, धोंडी पाताडे l, रविकांत सावंत, बाळकृष्ण गुरव, स्नेहलता पाताडे या सर्व विजयी उमेदवारांचे माजी अध्यक्ष संजय सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा