You are currently viewing काव्यपुष्प-७४ वे

काव्यपुष्प-७४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

काव्यपुष्प-७४ वे

—————————————-
रामनामाचे महत्व ।रामनाम हे जीवनसत्व । असे संस्कार-तत्व । येई मनात घेता रामनाम ।। १ ।।

श्रीमहाराजांचे चिंतन । जे त्यांचे मनन । असे कल्याण-साधन । एक हे रामनाम ।। २ ।।

श्रीमहाराजांचे विचार । मनावर घडवी संस्कार ।
त्यांच्या उपदेशांचे सार । घ्यावे सदा रामनाम ।। ३ ।।

मनात ध्यास एक हवा । नेहमी भगवंत हवा ।
पालटेल अंतरीची हवा । भगवंत नाम घेता घेता ।। ४ ।।

वेगळे नसे हे ” नाम “। घ्यावे भगवंत नाम ।
प्रेमाने घ्या रामनाम । दोन्हीही एकच असे प्रेमनाम “।।५ ।।

माणसाचे मन हेकेखोर । तितकेच शंकेखोर । पाठी लागता
शंका, खरोखर । मन अस्वच्छ राही ।। ६ ।।

आचरण-अनुभवांती । शंका नाहीशा होती । श्री महाराज म्हणती । होईल मन स्वच्छ ।। ७ ।।
—————————————–
करी क्रमशः लेखन – कवी अरुणदास
—————————————–
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-७४ वे
-अरुण वि.देशपांडे-पुणे
——————————— ——-

प्रतिक्रिया व्यक्त करा