You are currently viewing इचलकरंजीत रामनवमी उत्सवानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

इचलकरंजीत रामनवमी उत्सवानिमित्त नेत्र तपासणी शिबिर

इचलकरंजी /प्रतिनिधी :

 

धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड ; उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक इचलकरंजी शहरातील गावभाग येथे जगताप तालिम मंडळ, अण्णा कावतील ग्रुप आणि मुंबईचे इन्फिगो आय हॉस्पीटल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी उत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आला.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यानिमित्ताने धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड दिल्याने या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.

इचलकरंजी शहरात गावभाग परिसरातील जगताप तालीम मंडळ व अण्णा कावतील ग्रुप यांच्या माध्यमातून धार्मिक सण, उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.आज रविवारी रामनवमी उत्सवानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन शरीरसौष्ठव खेळाडू महाराष्ट्र ‘श्री‘ अजिंक्य रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप, किरण लंगोटे यांच्यासह इन्फिगो आय हॉस्पिटलचे सुशांत शेवाळे, ऑप्टम विवेक तपकीरे, सहकारी तेजस्वीनी नल्ला यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या शिबिरात सहभागी शिबिरार्थींची वैद्यकीय पथकाने नेञ तपासणी औषधोपचार केले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर निंबाळकर, अमोल जगताप, अविनाश दत्तवाडे, राहूल जगताप, डॉ प्रकाश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.दरम्यान , रामनवमी उत्सवानिमित्ताने धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड दिल्याने या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fifteen =