You are currently viewing पिडीत महिला व बालिकांसाठी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित..

पिडीत महिला व बालिकांसाठी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित..

सिंधुदुर्गनगरी  : 

कोणत्याही वयोगटातील पिडीत महिला व बालिकांसाठी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आले आह. जिल्हा रुग्णालय परिसर येथील टाईप फोर, इमारत क्रमांक 6, रुम नं. 1 येथे सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

या वन स्टॉप सेंटरचा उद्देश पुढल प्रमाणे आहे. हिंसाचारामुळे पिडीत महिलांना खाजगी व सार्वजनिक ठिकाणी, कुटुंब व समुदाय आणि कार्यस्थळांवर आधार देणे, वय, वर्ग, वंश , शैक्षणिक स्थिती, वैवाहित स्थिती, वंश आणि संस्कृतीची, पारंपारिक रुढींची पर्वा न करता शारिरीक, लैंगिक, भावनिक, मानसिक, आर्थिक अत्याचार होणाऱ्या महिलांना सहाय्य करणे, लैंगिक छळ, घरगुती हिंसाचार, तस्करी, सन्मानाचे गुन्हे, ॲसिड हल्ला किंवा जादुटोणा संदर्भातील स्त्रियांविरोधातील हिंसाचाराचे गुन्हे या प्रकारांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांना वन स्टॉप सेंटर मार्फत विशेष सेवा पुरविल्या जातात. पिडितेस एका छताखाली एकात्मिक सहाय्य देणे व समर्थन प्रदान करणे, तसेच वैद्यकीय, कायदेशीर, मानसशास्त्रीय आणि समुपदेशन सहाय्यासाठी अनेक तातडीच्या व आपत्कालीन सेवा पुरवणे.

या वन स्टॉप सेंटरमध्ये कोणत्याही वयोगटातील महिलांना कोणत्याही मदतीसाठी वन स्टॉप सेंटर शी संपर्क साधता येवू शकतो. केंद्र शासनाने हिंसाचार ग्रस्त महिलांना आणि बालिकांना सुलभ व सुखकर आयुष्यासाठी मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागातर्फे संयुक्त विद्यमाने या सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटर अंतर्गत पिडितेस आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पोलीस सेवा, कायदेविषयक सल्ला व मदत, मानसिक समुपदेशन पुरविण्यात येते. तसेच आवश्यक असल्यास 5 दिवस तात्पुरत्या वास्तव्याची सुविधाही पुरविण्यात येते.  हिंसाचारग्रस्त महिलांना तातडीची मदत म्हणून वन स्टॉप सेंटरही आधआर व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत 182 सेंटर्स उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला आहे. नव्याने मंजूरी देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वन स्टॉप केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरच्या व्यवस्थापक समितीच्या अध्यक्ष हे जिल्हाधिकारी हे आहेत. सदस्य सचिव हे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी आहेत. हे सेंटर जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त कार्यरत आहे. तरी कोणतीही हिंसाचरग्रस्त महिला स्वतःचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मदतीसाठी येऊ शकते. अधिक माहितीसाठई संपर्क क्र. 02362-229039 किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय – 02362-228869 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + three =