You are currently viewing वैभववाडीतील पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करुन घ्यावा”

वैभववाडीतील पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करुन घ्यावा”

 संदेश पारकर यांची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी

वैभववाडी तालुक्याचा पर्यंटनदृष्टया विकास व्हावा यासाठी शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके उपस्थित होते.
वैभववाडी तालुका हा ग्रामीण असुन कोकण सह्याद्रीचा निसर्गसंपन्न भाग आहे. याठिकाणी राज्यातुन अनेक पर्यटक भेट देत असतात. याठिकाणच्या नापणे गावात बारमाही धबधबा वाहत असतो. परंतु पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच ऐनारी गावात ऐतिहासिक पांडवकालीन गुहा आहे. परंतु निधीअभावी येथे सुविधा उपलब्ध नसल्याने हि गुहा दुर्लक्षित झालेली आहे. नापणे धबधबा तसेच ऎनारी गुहेच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास वैभववाडी तालुक्याला पर्यंटनदृष्ट्या महत्व प्राप्त होणार आहे असे श्री.पारकर यांनी मंत्रिमहोदयांना सांगितले.
नापणे व ऐनारी येथील पर्यटन स्थळांना भरगोस निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. श्री.ठाकरे यांनी या दोन्ही पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण करण्याबाबतचा अहवाल मागवून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन श्री.पारकर यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा