You are currently viewing सिंधुदुर्गात उद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करणार…

सिंधुदुर्गात उद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करणार…

केंद्रीय उदयोगमंत्री राणेंची देवगड तालुक्यातील जनआशीर्वाद यात्रेत घोषणा

देवगड

देवगड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ विविध योजना सर्वसामान्य जनतेकरिता सुरू केल्या या माध्यमातून गरीबातल्या गरिबाला दोन वेळेचे जेवण मिळावे .वैयक्तिक सेवेचा लाभ मिळावा,या हेतूने ग्रामीण भागातील जनतेकरिता योजना राबविल्या.याचा लाभही या तालुक्यातील जनतेला झाला असून देवगड तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला प्रेम दिले, आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनतेचे आशीर्वाद घ्यावे व त्या प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वाढविणे व त्यांचे ऋण फेडावे या हेतूने या जनाशीर्वाद यात्रे मधून मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे , या भागाचा विकास आम.नितेश राणे यांच्या माध्यमातून करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी देवगड तालुक्यातील जनाशीर्वाद यात्रेत ठिकठिकाणी बोलताना व्यक्त केला.

केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री सिंधुदुर्ग सुपूत्र ना. नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत असताना यानिमित्ताने मुंबई येथून सुरू झालेली जनआर्शिवाद यात्रा देवगड तालुक्यात शनिवारी सकाळी ११ वाजलेनंतर शिरगाव येथे दाखल झाली. यावेळी शिरगाव बाजारपेठेत त्यांचे ढोल तासाच्या गजरात फुले उधळून फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्ते पदाधिकारी महिला ग्रामस्थ यांनी स्वागत केले.शिरगाव जिल्हा परिषद गट,फणसगाव ,जी प गट यांच्या वतीने केंद्रीय मंत्री यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,आशिष शेलार,आम रवींद्र चव्हाण, अतुल काळसेकर,आम प्रसाद लाड, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम,राजू शेट्ये,मंगेश लोके,संतोष फाटक,महेश नारकर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तळेबाजार व्यापारी ग्रामस्थ, दशक्रोशीच्या वतीने त्यांच्या उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी याच्यासह दशक्रोशीतील भाजपा शुक्रवारी ना.नारायण राणे याची जनआर्शिवाद यात्रा जिल्ह्यात येणार असून खारेपाटण नतंर तळेरे, वैभववाडी, फोंडामार्गे कणकवली येथे दाखल झाली आहे.सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.राणे यांनी जोडलेले सगळे कार्यकर्ते व सामान्य माणूस आपल्या हक्काचा माणूस केंद्रीय मंत्री झालेला आहे.यासाठी या विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यानी उत्साहात स्वागत करीत आहेत .या यात्रेचे आगमन जामसंडे येथे होताच माजी आम.अप्पासाहेब गोगटे यांचे पुण्यसमरण करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी जनसंघाचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष साटम ,सुंदर जगताप ,बळवंत मसुरकर व अन्य यांनी त्यांचे शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच देवगड आंबा उत्पादक संघ,सकल मराठा समाज बांधव,देवगडअर्बन बँक ,विविध संघटना बचत गट यांनीही केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले.

या नंतर देवगड येथेही विविध संघटना संस्था यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.कुणकेश्वर ग्रामपंचायत येथेही स्वागत करण्यात आले मिठबाव भागात यात्रेचे आगमन होताच उत्स्फूर्त स्वागत होऊन त्यानंतर ही यात्रा आचरा मालवण कडे रवाना झाली.या यात्रेतभाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, देवगड नगराध्यक्ष प्रियांका साळसकर,योगेश चांदोस्कर प्रणाली माने,,उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर उमेश ।कणेरकर ,संजय तारकर ,सभापती रवी पाळेकर,भाजप अध्यक्ष डॉ अमोल तेली रामकृष्ण जुवाटकर,शरद ठुकरुल,जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी,शहर अध्यक्ष योगेश पाटकर राजा भुजबळ रेश्मा जोशी सर्व नगरसेवक नगरसेविका जि प.,प.स.सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =