You are currently viewing वसंत

वसंत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री अरविंदजी ढवळीकर यांचे अप्रतिम काव्यरचना

वृक्षांना पालवी फ़ुटेलच की
आसमंत गंधित होईलच कीं
पक्षांची किलबिल ऐकता ऐकता
भान हरपून जाईलच कीं
पाझर मनात फुटला पाहिजे
वसंत हृदयात फुलला पाहिजे
आपल्यावर प्रेम उमलेलंच कीं
हा माझा तो दुजा होईलच कीं
आप्तांच्या मठात रंगता रंगता
घरच्यांच्या मिठीत रमेलच कीं
झोपडीत ही दिवा पेटला पाहिजे
वसंत हृदयात फुलला पाहिजे
निसर्ग रूप पालटेलच कीं
नद्या नाले वाहतीलच कीं
ग्रीष्म झळा सोसता संपता
सुखद गारवा हसवेलच कीं
निसर्गाचा ऋण फिटलं पाहिजे
वसंत हृदयात फुलला पाहिजे
धन धान्य पीकेलच कीं
सण सोहळे सजतीलच कीं
पूजा पाठ करता करता
अंतरी भक्ती उमटेलच कीं
कर्तव्याचा धूप जाळला पाहिजे
वसंत हृदयात फुलला पाहिजे
दाता दान देईलच कीं
देव परीक्षा घेईलच कीं
सौंदर्य सुखात न्हाता न्हाता
तृप्तीचा ढेकर येईलच कीं
ऋतूंचे मर्म जाणले पाहिजे
वसंत ह्रयद्यात फुलला पाहिजे

अरविंद
20/3/21

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 17 =