You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताह कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताह कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्‍ताह कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय  व विशेष सहाय विभाग याच्या मार्फत दरवर्षी  14 एप्रिल 2022 हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह दि. 6 एप्रिल ते 16 एप्रिल 2022  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम आजपासून राबविला जात आहे. समाज कल्याण विभागामार्फत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. दि. 7 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्यातील महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन. दि. 8 एप्रिल 2022 रोजी  जिल्हा स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन, स्वाधार शिष्यवृत्ती मिनी ट्रॅक्टर लाभार्थ्यांना प्रतिनिधिक वाटप. दि. 9 एप्रिल  रोजी जेष्ठ नागरीकांचे  जनजागृती शिबीर व नागरीकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्ऱ्याने सर्व महाविद्यालय , आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह,येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले अहे.  दि. 10 एप्रिल रोजी समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या व्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन. दि.11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करुन, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयी व्याख्यात आयोजित करण्यात आले आहे.  दि. 12 एप्रिल रोजी जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच मार्जिन मनी योजननेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित केलेला आहे. दि. 13 एप्रिल रोजी संविधान जागर- संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दि.14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालये, महाविद्यालय, आश्रमशाळा, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम व्याख्यान, चर्चासत्र इ. कर्याक्रबद्दल संबंधित सर्व लोकप्रनिनिधींना उपस्थित राहणेबाबत आमंत्रण. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळाव आयोजित करुन डॉ. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान. जिल्हा जात प्रमाणपत्र कार्यालयात प्रमाणपत्र प्रदान करणे. दि. 15 एप्रिल रोजी सहायक आयुक्त , समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून डॉ. बाबासाहेबांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान तसेच तृतीय पंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रम. दि. 16 एप्रिल रोजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नावबौध्द वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे व अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार लाभार्थ्यांचे  मनोगत कार्यक्रम आणि समता सप्ताह समारोप.

प्रतिक्रिया व्यक्त करा