You are currently viewing इचलकरंजीत रोटरी क्लबतर्फे ट्रेडफेअरचे आयोजन

इचलकरंजीत रोटरी क्लबतर्फे ट्रेडफेअरचे आयोजन

इचलकरंजी

इचलकरंजी रोटरी क्लबच्यावतीने येत्या 21 ते 25 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या मध्यवर्ती ठिकाणी रोटरी ट्रेडफेअर प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ यांनी पञकार बैठकीत बोलताना दिली.

विविध उद्योग क्षेञातील उत्पादित वस्तूंच्या खरेदीला चालना मिळावी आणि सर्वसामान्य वर्गाला एकाच छताखाली वस्तूंची खरेदी करता यावी ,याच उद्देशाने इचलकरंजी रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी ट्रेडफेअरचे
आयोजन करण्यात येत आहे.यंदाच्या
वर्षाचे रोटरी ट्रेडफेअरचे 21 वे वर्ष आहे. या वर्षी लेडीज व जेंट्स कपडे स्टॉल, आर्टीफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू , घरगुती साधने विभाग, मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहने विभाग, वॉटर प्युरिफायर इत्यादीचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत.याशिवाय खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी खादयपदार्थांचे विविध प्रकार आईस्क्रिम, ज्यूस, फूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांच्याकरिता मिनि वर्ल्ड अशा सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे इचलकरंजी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ यांनी पञकार बैठकीत बोलताना सांगितले.तसेच
इचलकरंजी शहर परिसरातील नागरिकांच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाते.यामध्ये गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी, विविध शाळांना कॉम्प्युटर, स्वच्छतागृह, बॅचेस, डोळयांची शस्ञक्रिया, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर व इतर उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी ट्रेड फेअर ही
इचलकरंजी शहर परिसरातील व्यावसायिक उत्पादक, विक्रेते, संस्थांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची उत्तम पर्वणी आहे.सध्या स्टॉल बुकींग सुरू असून इच्छुकांनी आपला स्टॉल निश्चित करावा आणि या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन ट्रेडफेअरचे चेअरमन सत्यनारायण धूत यांनी केले.
या पञकार बैठकीस सेक्रेटरी संजय घायतिडक, ट्रेडफेअरचे चेअरमन सत्यनारायण धूत , सेक्रेटरी अभय यळरूटे, प्रकाश गौड, मुकेश जैन, वसंत पाटील, मनिष मुनोत, अजित कुरडे, महेंद्र मुथा, विक्रम बुचडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा