You are currently viewing सावंतवाडीत अर्धवट स्थितीतील डेपोमुळे प्रवाशांना  त्रास

सावंतवाडीत अर्धवट स्थितीतील डेपोमुळे प्रवाशांना  त्रास

सावंतवाडी

सावंतवाडीच्या नूतन डेपोसाठी आमदार दिपक केसरकर यांनी पाच कोटी रुपये मंजूर करून आणले होते. या निधीअंतर्गत कामही सुरू झाले. मात्र, डेपो भरण्याचे काम अर्धवट स्थितीत असून यामुळे प्रवाशांना पावसाळा असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केसरकर समर्थक संतप्त झाले. त्यांनी अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सावंतवाडीच्या एसटी बस आगाराला धडक दिली.

आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना जाब विचारला. आमदार केसरकर यांच्या निवासस्थानासमोर एसटी डेपो असूनही काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे केसरकर यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे. या बदनामीला अधिकारी वर्ग कारणीभूत असून काम गतीने होण्यास या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा निधी असूनही केला असा आरोप केसरकर समर्थकांनी केला. केसरकर समर्थकांनी या कामाचा ठेकेदार कोण, काम होण्यास उशीर का झाला असा सवाल बोधे यांना केला. मात्र बोते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे मंगळवारी विभाग नियंत्रक, ठेकेदार आणि आमदार दिपक केसरकर यांच्या समवेत बैठक घेण्याचे केसरकर समर्थकांनी सूचित केले. यासंदर्भात उद्या बैठक होणार आहे.

नूतन डेपोला पाच कोटी रुपये मंजूर झाले. जिल्ह्यातील अन्य डेपोंचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या डेपोचे कामच रखडले आहे. याला ठेकेदार आणि एसटी महामंडळ जबाबदार आहे. जुन्या बस स्थानकाला गळती लागली आहे. पावसाच्या पाणी प्रवाशांन वर पडत आहे. सावंतवाडी आगार आणि वेंगुर्ला डेपो येथे अस्वच्छता आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसाेयीला ला सामोरे जावे लागत आहे. सध्या आगाराचा कोंडवाडा झाला आहे.. जिथे प्लॅटफॉर्म आहेत . येथे वर्कशाॅप उभारण्यात आला आहे. यासंदर्भातही केसरकर समर्थकानी बोधे यांना जाब विचारला.हे काम ठेकेदार कृती आणि घेतल्याचे बोधे यांनी सांगितले. घरात स्वच्छता कामगार दोनच आहेत. त्यामुळे ताण येतो असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेचे कामगार घेऊन सावंतवाडी आगाराने वेंगुर्ला डेपो स्वच्छ करावा अशी सूचना समर्थकांनी केली. उद्या विभाग नियंत्रक, ठेकेदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे आमदार केसरकर हे उपस्थित राहणार आहेत .यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, नंदू गावडे, विश्वास घाग, प्रकाश बिद्रे, निलेश कुडव उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =