You are currently viewing कणकवलीत ९ एप्रिल रोजी सर्व जाती, संस्था प्रतिनिधींची बैठक..

कणकवलीत ९ एप्रिल रोजी सर्व जाती, संस्था प्रतिनिधींची बैठक..

समाजातील विवाहाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक वधू-वरांसाठी विचारविनिमय करून मार्ग काढण्यासाठी विविध समाजातील जातीच्या प्रतिनिधींची आंतरजातीय समन्वय समिती स्थापित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी शनिवारी 9 एप्रिल रोजी भवानी सभागृह, तेलीआळी, कणकवली येथे सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक जातीच्या संस्था व संघटना प्रतिनिधींनी किंवा पदाधिकारी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज संघटनेचे राष्ट्रीय संघटक चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.

बैठकीस गाबीत समाज, मराठा, तेली, शिंपी, कुंभार, गुरव, वैश्य, धनगर, चर्मकार वगैरे समाजातील प्रतिनिधी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारे प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर कमिट्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे, समाज वधु वर मेळावा घेणे, सर्व जाती साठी एकत्रित मेळाव्याचे आयोजन करणे, घटस्फोटीत यांसाठी स्वतंत्र मेळावा घेणे, विधूर व विधवा यांसाठी मेळावा आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थी भावनेची काम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यानंतर शेखर उपरकर यांनी सांगितले. तसेच या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + nineteen =