सिंधुदुर्गनगरी,
भारतीय हवामान विभागाने देशात उष्णतेची लाट येत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत आहे. जिल्ह्यातील तापमानामध्ये वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.
जिल्ह्यात दुपारचे तापमान वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे, उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व लहान मुले, गरोदर महिला, स्थुल लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, मधुमेही, हृदयविकास, दारुचे व्यसन असणारे, घट्ट कपडे घातलेले, घरदार नसलेले, कारखान्यात बॉयलस जवळ काम करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंधित नागरिकांना उष्माघात होतो. त्यामुळे या अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे.
उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ किंवा गंभीर स्वरुपाचा असतो. थकवा येणे, ताप येणे, शरिरावर रॅश उमटणे, हातापायांना गोळे येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता ही लक्षणे अतिउष्ण वातावरणात जाणवतात. अशी लक्षणे अढळल्यास आरोग्य यंत्रणेशई संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. विजय नांद्रेकर व जिल्हा साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत सवती यांनी केले आहे.
सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 अंश जास्त तापमान असेल तर त्यास उष्णतेची लाट म्हणतात. सदर दोन दिवस तापमान 45 अंश पेक्षा जास्त अशेल तर त्या भआगात उष्णतेची लाट आली आहे असे म्हटले जाते. एप्रिल, मे व जून महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव अधिक असतो. तसेच मृत्यू होण्याची शक्यता असते. अशावेळी पुढील उपाययोजना कराव्यात. पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे सैलसर कपडे वापरावेत. गॉगल, छत्री, टोपी व चप्पला यांचा वापर करावा, पंखा, कुलरच्या मदतीने घर, कार्यालय थंड ठेवावे, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रिन लावावे, सरबत, जलसंजीवनीचा वापर करावा.