You are currently viewing युवा पिढीला दिशा देण्यासाठी “युथ फोरम”

युवा पिढीला दिशा देण्यासाठी “युथ फोरम”

देवगड :

 

देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी कायमच युवा पिढीच्या खांद्यावर राहिली आहे. प्रत्येक सेकंदाला अपडेट होत असलेल्या आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वावरणार्‍या युवा पिढीला करिअरची योग्य दिशा मिळाली. तर ही युवा पिढी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या कुशल बुद्धिमत्तेचा नक्कीच ठसा उमटवेल. या वाटेवर कोणत्याही शैक्षणिक अडचणी असल्यास अथवा करिअरच्या दिशेने पाऊल टाकताना येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करण्यासाठी ही संस्था व त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी केले आहे.

‘यूथ फोरम देवगड’ या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पार पडला. हा कार्यक्रम संस्थाध्यक्ष माणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, खजिनदार सागर गावकर, सहसचिव प्रथमेश माणगावकर, रसिका सारंग, संघटक अपेक्षा सकपाळ, सोशल मीडिया प्रमुख विपुल नलावडे यांच्यासह संस्थेचे सभासद व स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम कोरोना विषयक नियमांचे पालन करून पार पाडले. युवावर्गाने युवावर्गाच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. सामाजिक बांधिलकीतून ही संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे असे माणगावकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =