You are currently viewing कणकवलीत महायुतीच्या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद…

कणकवलीत महायुतीच्या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद…

कणकवलीत महायुतीच्या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद…

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आज कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात होत आहे. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात महायुतीतील तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरात बाईक रॅली काढली. त्यात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला प्रारंभ झाला.दरम्यान काही वेळासाय महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा सुरू होणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + seven =