You are currently viewing कणकवलीत आठ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर…!

कणकवलीत आठ दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर…!

बाजारपेठ, भाजी, मासे, फुल विक्री पूर्णपणे बंद; औषध दुकानांनाही नियमावली, शहरातील बँका पण राहणार बंद..!

कणकवली :

कणकवली जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यासाठी व्यापारी, सामाजिक संघटना, सर्व नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, यांची सोशल डिस्टन्स पाळत संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना केले आवाहन मागील 6 महिन्यात व्यापारी व नागरिकांना त्रास दायक एकही निर्णय नगरपंचायतने घेतला नाहीय, सर्वांनी नगरपंचायतला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे नलावडे म्हणाले.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत कर्फ्यू पाळणे आहे अत्यंत आवश्यक, एक फळी उघडी असलेला बंद उपयोगाचा नाही असेही ते म्हणाले. अत्यावश्यक सेवाही ठेवावी बंद. आवश्‍यकतेनुसार औषधे रुग्णांना पुरवण्याची जबाबदारी मेडिकल असोसिएशनने घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी एकजूट दाखवून योग्य तो निर्णय घ्यावा, नगरपंचायत निर्णय लादणार नाही असे भावनिक आव्हान नलावडे यांनी केले. चर्चेअंती कणकवली बाजारपेठ नगरपंचायत हद्दीतील शहर आणि ग्रामीण भागात 8 दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी 20 ते रविवारी 27 सप्टेंबर असा हा जनता कर्फ्यू चा कालावधी राहणार आहे. सोमवारी 28 पासून कणकवलीतील बाजारपेठेत पूर्ववत सुरू होईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, विरोधी गटनेता सुशांत नाईक, नगरसेवक अभी मुसळे, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, व्यापारी मंदार आळवे, राजन पारकर, नंदू उबाळे, दत्ता शंकरदास, सुजित जाधव, गणेश कुडाळकर, गीतांजली कामत यांच्यासह व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कणकवली शहरातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण कणकवलीत जनता कर्फ्यू जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू चा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा