You are currently viewing सुंदरवाडीचे नगराध्यक्ष संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन…
सुंदरवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन...

सुंदरवाडीचे नगराध्यक्ष संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन…

सुंदरवाडीचे युवा नगराध्यक्ष संजू परब यांचा आज वाढदिवस… सावंतवाडी तालुक्यातील मडुरा हे मूळ गाव असलेले संजू परब लहानाचे मोठे सावंतवाडीतच झाले. सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कुल मधून माध्यमिक शिक्षण व श्री पंचम खेमराज महाविद्यालयात उच्चशिक्षण घेऊन सावंतवाडीतच बांधकाम क्षेत्रात आपले करियर घडविण्यासाठी उतरले व बिल्डर्स व डेव्हलपर्स म्हणून ओळखले जाऊ लागले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन ते राजकारणात आले. निलेश राणे यांच्या मर्जीतले म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे.

काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या सावंतवाडीतील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत गेली २३ वर्षे सावंतवाडी नगरपलिकेतील दीपक केसरकर यांची निर्विवाद असलेली सत्ता उलथवून अनपेक्षितरीत्या संजू परब सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले. मागील नगरपालिका निवडणुकीत आपले आठ नगरसेवक निवडून आणून त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र सर्वच आघाडींवर श्रेष्ठ ठरत त्यांनी विजय अक्षरशः खेचून आणला. त्यांच्या विजयामुळे सावंतवाडी नगरपालिकेत प्रथमच माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची सत्ता आली आणि गेली कित्येक वर्षे सावंतवाडीवर सत्ता मिळविण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न साकार झाले.

संजू परब हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्ती उच्चशिक्षित असल्याने एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा त्यांना लाभलेला आहे. गोरगरिबांचा कळवळा असलेले संजू परब संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. गतवर्षी आलेले पुराचे संकट असो वा आज देशावर आलेले कोरोनाचे संकट. संजू परब नेहमीच मदत कार्यात आघाडीवर असतात. कोरोनाच्या संकटात परप्रांतीय मजुरांची उपासमार होत असताना स्वखर्चाने त्यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. काही ठिकाणी एकवेळच्या जेवणाची सुद्धा सोय केली व गोरगरिबांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला.

संजू परब मदत करताना पक्षाकडून अथवा वरिष्ठ पातळीवरून मदत येईल यासाठी कधीही थांबत नाहीत, स्वखर्चाने गरजूंना मदत करून त्यांच्या समस्या मार्गी लावतात, त्यामुळेच अनेक लोक मोठ्या आशेने त्यांच्याकडे मदतीसाठी येतात. सरकारी दफ्तरातील कामे असो वा इतर शासकीय कामे स्वतः लक्ष देऊन ते लोकांना सहकार्य करतात. त्यामुळेच संजू परब यांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

संजू परब यांच्या दिलदार वृत्तीमुळे त्यांचा मित्रपरिवार सुद्धा मोठा आहे. अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या एका शब्दावर कामासाठी हजर राहणारे त्यांचे साथीदार आहेत. त्यांच्या याच दिलदार स्वभावामुळे त्यांच्या निवडणुकीच्या वेळी कित्येकजण दिवसरात्र त्यांच्या विजयासाठी झटत होते. सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाल्यानंतर सावंतवाडीतील छोट्या मोठ्या समस्या त्यांनी तात्काळ सोडविल्या, आणि भविष्यातही सावंतवाडीचा हर एक प्रकारे विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

सावंतवाडीच्या या युवा नगराध्यक्षाचा आज वाढदिवस….

*संवाद मिडियाकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + eight =