You are currently viewing सन 2021-22 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थिनींची Capgemini व Wipro कंपनीमध्ये निवड

सन 2021-22 मध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थिनींची Capgemini व Wipro कंपनीमध्ये निवड

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स फॉर वुमेन(बीसीए) शिरगांव,रत्नागिरी येथील टी.वाय.बीसीए च्या विद्यार्थिंनीसाठी मागील बारा वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंट अंतर्गत विप्रो, इन्फोसिस, कॉग्नीझंट, टीसीएस, ॲटॉस, पटनी Capgemini व Deloitte इ. बहुराष्ट्रीय कंपनींच्या इंटरव्हयूवचे आयोजन करण्यात येते.
लेखी व इंटरव्हयु च्या पूर्व तयारीसाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना aptitude test training इंग्लिश स्पिकींग इ. विषयामार्फत प्रशिक्षण दिले जाते.
Capgemini तर्फे घेण्यात आलेल्या लेखी व इंटरव्हयू परिक्षेतून टी.वाय.बी.सी.ए च्या कु.गौरी घाणेकर , कु.ईशा जोशी, कु.शालवी देसाई, कु.ऐश्वर्या निंबाळकर ,कु.पायल हजारे या विद्यार्थिनींची तसेच Wipro तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेतून कु.ईशा जोशी व साक्षी बने यांची यशस्वी निवड झाली.
या विद्यार्थिनींना बीसीए महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या कु.स्नेहा कोतवडेकर,ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफीसर स.प्रा.केतन पाथरे व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल रत्नागिरी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख मा.श्री.मंदार सांवतदेसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =