You are currently viewing कणकवलीत वैश्य समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

कणकवलीत वैश्य समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली :

कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा 25 फेब्रुवारी रोजी उस्फुर्तपणे पार पडला.

कार्यक्रमाचे उदघाटन सर्वश्री दत्तात्रय उर्फ भाई तवटे माजी जनरल मॅनेजर एच.पी.सी.एल. विद्यमान अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली यांचे हस्ते आणि श्री राजन तेली, संदेश पारकर, समीर नलावडे, प्रसाद पारकर, दीपक अंधारी, सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी सोहळ्यास कार्यकारिणीचे सर्व सदस्य सर्वश्री महेंद्र मुरकर, गुरुनाथ पावसकर, प्रवीण पोकळे, चंद्रशेखर वाळके, दिशा अंधारी, सुप्रिया अंधारी, डॉ. विद्याधर तायशेट्ये, भालचंद्र अंधारी, सल्लागार श्री बाळासाहेब वळंजू, राजन पारकर, प्रसाद अंधारी, उमेश वाळके, तानावडे, नांनचे, माणगावकर, शिरसाठ, कोदे, काणेकर, शिक्षक वृंद आणि इतर वैश्य बांधव, भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी सोहळ्यात समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण 54 अन समाजातील अन्य 11 मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्प, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याबाबत सर्वांनी आभार व्यक्त केले. उदघाटक श्री भाई तवटे यांनी काही प्रसंगोचित उदाहरणे देऊन सहकार्याने आणि एकोप्याने काम करून समाजोन्नत्ती करावी, असे कथन केले. राजन तेली यांनी शासनाच्या सर्व सुविधांची माहिती देऊन त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, असे मार्गदर्शन केले. संदेश पारकर यांनी कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व यांचे जोरावर समाजाने नेतृत्व करावे, असे कथन करून समाजाने आपणस अडचणीचे वेळी खूप सहकार्य केल्याचे आवर्जून नमूद केले. समीर नलावडे यांनी सत्कार सोहळ्याचे कौतुक करून अशा उपक्रमांची समाजाला गरज असून सर्व प्रकारचे सहकार्य करणेची ग्वाही दिली. भविष्यात वैश्य भवन उभारण्यास जागा अन आर्थिक योगदान देणेचे अभिवचन दिले. श्री दीपक नेवगी यांनी गुरू महिमा कथन करून अध्यात्मिक उर्जेकडे निर्देश केला. तर अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी या सत्काराचे निमित्ताने कणकवली तालुक्यातील समाज बांधवांच्या एकतेची मशाल पेटून चांगले आणि नाविन्यपूर्ण विचारांचे आदानप्रदान होईल. परिचय आणि स्नेहबंध वाढतील. श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या कृपा आशीर्वादाने समाज उन्नत्ती आणि स्वप्ने सफल होतील असे सांगून शुभेछ्या दिल्या.

सोहळ्यात आभार प्रदर्शन श्री गुरुनाथ पावसकर यांनी केले. प्रास्ताविक श्री तानावडे आणि सूत्रसंचालन श्री नानचे यांनी केले. सौ माणगावकर, शिरसाट आणि अन्य मान्यवरांनी बहुमोल सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा