You are currently viewing कोंदण हिरा

कोंदण हिरा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य हेमा जाधव यांची साकव्य ग्रुप आयोजित अष्टाक्षरी स्पर्धेतील उत्कृष्ट क्रमांक प्राप्त काव्यरचना

तिच्या स्त्रित्वाची कहाणी

कोंदण हिरा

मर्यादेच्या प्रांगणात
तिच्या स्त्रित्वाची कहाणी
दाही दिशा एकवटे
डोळ्यांमध्ये खेळे पाणी

हिरा कोंदण साच्यात
न्यारी चमक तयाची
तेच अस्तित्व शोभते
नारी मानिनी जगाची

पंख पसरूनी सारे
झेप गगनी यशाची
उंबरठा स्वाभिमान
चाड जपते घराची

कप्पा हळवा लपतो
कर्तव्याच्या पदरात
घरकुल उजळते
जशी तेवणारी वात

तिच्या स्त्रित्वाची कहाणी
हिरकणी वाघीणीची
जिजाऊच्या रमाईच्या
सावित्रीच्या घडणीची

जबाबदारीचा अर्थ
संयमाच्या अंगणात
सोशिकता सामावून
घेते नारी संसारात

धैर्यशील काळजाची
काळोखाच्या काजळीत
नारी रात्र जोजवते
काळजीला दटावीत

हेमा जाधव©
९५४५०८२८१७

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + eleven =