You are currently viewing रेडी येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दशावतार नाट्यमहोत्सव

रेडी येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दशावतार नाट्यमहोत्सव

 

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्र मंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप, रेडी यांच्या तर्फे रेडी येथे सहा दिवसीय भव्य दशावतार नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन ७ एप्रिल २०२२ रोजी सायं. ६:३० वा. माजी खासदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. रेडी ग्रामपंचायत पटांगण येथे गुरुवार ७ ते बुधवारी १३ एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात ७ एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. “विघ्न निवारि गजमुख तारी” जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस, सावंतवाडी, यांचे नाटक तसेच शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेन्दवण, कुडाळ यांच सायं. ७:०० वा.  “वज्रशल्क अर्थात खवले मांजर”, हे नाटक त्याचप्रमाणे ९ एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. नाईक दशावतार नाट्यमंडळ, झरेबांवर दोडामार्ग यांचा ‘सत्वपरिक्षा’, व  १० एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. अमोल मोचेमाडकर संचलित मामा मोचेमाडकर पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड-वेंगुर्ला यांच ‘मायावी मधुवंती’, नाटक तसेच १२ एप्रिल रोजी सायं. ७:०० वा. मयुर गवळी संचलित हेळेकर दशावतार नाट्यमंडळ. कारीवडे, सावंतवाडी यांच “महिमा संकष्टी व्रताचा” हे नाटक तर १३ एप्रिल सायं. ७:०० वा. खानोलकर पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, खानोली-वेंगुर्ला यांच “विक्रमासुर लावण्यवती ” हे शेवटचे नाटक सादर होणार आहे.

तरी या नाट्यमहोत्सवामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी  होऊन त्या अधिक माहितीसाठी अण्णा गडेकर ९४२३८३५६१३, अंकुश राणे ७३५०१६९२४२, सागर राणे , प्रसाद राऊळ ९४२१३७६७०८, विलास राउत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =