You are currently viewing क्वारी व चिरेखणीवर सुरू असलेले अनधिकृत उत्खनन थांबवा – मनसे उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर

क्वारी व चिरेखणीवर सुरू असलेले अनधिकृत उत्खनन थांबवा – मनसे उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर

सावंतवाडी

तालुक्यात असलेल्या क्वारी व चिरेखणीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन सुरू आहे. ते तात्काळ थांबविण्यात यावे तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर यांनी केली आहे. दरम्यान याबाबत महसुल प्रशासनाने तात्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकात या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक ठिकाणी अनधिकृत चिरे उत्खनन आणि अनधिकृत क्वारी क्रशर चालू आहेत. मात्र याची कोणतीही दखल प्रशासन घेत नाही. त्यामुळे प्रशासनने सुरू असलेले अनधिकृत उत्खनन वेळीच थांबवावे, अन्यथा ज्याठिकाणी उत्खनन चालू आहे, त्याठिकाणच्या जनतेला घेऊन जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. साटेलकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 2 =