You are currently viewing वेदमूर्ती हरिश्चन्द्र यांना उत्कृष्ट संस्कृताचार्य गौरव पुरस्कार

वेदमूर्ती हरिश्चन्द्र यांना उत्कृष्ट संस्कृताचार्य गौरव पुरस्कार

 

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ आयोजित ३ एप्रिल २०२२ रोजी सम्पन्न झालेल्या भव्य जिल्हा मेळाव्यात श्री वेदमूर्ती हरिश्चंद्र मालू गवस ,मांगेली ता.दोडामार्ग यांना संस्कृत कार्यार्थ गौरव पत्र बहाल करण्यात आले.
या प्रसंगी क्षेत्राधिकारी ,शिवचैतन्य आजोबा आरवली सोन्सुरे संस्था,मा.आमदार रामेशदादा पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते. वेदमूर्ती हरिश्चन्द्र गवस हे संस्कृत कार्यानिमित्त विश्वविद्यालयात कर्तव्यबजावत असल्यामुळे त्यांचा हा बहुमान त्यांचे बंधु सूर्यनारायण गवस यांनी मान्यवरांच्या द्वारे स्वीकारला.
आचार्य हरिश्चन्द्र गवस हे गेली अनेक वर्षे आचार्य इन्स्टिट्यूट् सिंधुदुर्ग संस्थेमार्फत ,मांगेली सारख्या अत्यंत ग्रामीण भागातून ,शेतकरी कुटुंबातील असे व्यक्तिमत्व ,असून वेद संस्कृत आदी शास्त्रांचे अभ्यासक, हरिश्चन्द्र गवस शास्त्रांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. संस्कृत भाषेच्या उत्थानार्थ अहोरात्र कार्यरत आहे याचा सिंधुदुर्ग वासियांना सार्थ अभिमान आहे.
संस्कृत भाषेकरीता विविध स्तरावर कार्य करणाऱ्या वेदमूर्तींना *उत्कृष्ट संस्कृताचार्य गौरव पुरस्कार* संघटनेद्वारे गौरविण्यात आले आहे आहे. येत्या शैक्षणिकवर्षात मान्यता प्राप्त संस्कृत/योग आदी शिक्षणाची सिंधुदुर्ग वासियांसाठी सोय करणार असून भावी काळात सिंधुदुर्ग वासियांना योग,संस्कृत,ज्योतिष आदी पुरातन विद्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी परराज्यात अथवा दुसऱ्या जिह्यात जावे लागणार नाही हे निश्चितच .
आचार्य हरिश्चन्द्र गवस हे स्वतः उच्चविद्याविभूषित असून जनमानसात सरळ संस्कृत परीक्षेचे आयोजन,संस्कार ,संस्कृति शिबिरे,बाल संस्कार शिबिरे, ८ वी ,९ वी १० वी मुलांनाही व्याकरणसहित मार्गदर्शन आचार्य इंस्टिट्यूट् द्वारे दिले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =