इचलकरंजी/ प्रतिनिधी:
इचलकरंजी येथे विश्र्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ परिसरात दीपोत्सव करून हिंदू संस्कृतीप्रमाणे नव्या वर्षाचे स्वागत व गुढी पाडवा सण साजरा करण्यात आला. हिंदू संस्कृतीनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव्या वर्षाची सुरुवात समजली जाते.
याशिवाय साडे तीन मुहूर्तांपैकी एक असा गुढी पाडवा सण म्हणून साजरा केला जातो. याचे महत्त्व नव्या पिढीला कळावे, याच जाणीवेतून विश्र्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे शिवतीर्थ परिसरात दीप लावून नव्या वर्षाचे स्वागत व गुढी पाडवा सण साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाश किरणांनी हा परिसर उजळून उत्साहाचे वातावरण पसरले होते. यामध्ये रोषणाईची भर पडल्याने दीपोत्सव सोहळ्याला आणखी मोठी रंगत आली.
यावेळी विश्र्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, शरद बाहेती, सौ.रानडे ताई ,सनतकुमार दायमा ,कामत मामा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे इचलकरंजी शहर मंञी शहर प्रवीण सामंत, शहराध्यक्ष बाळासाहेब ओझा, माहिती प्रसार प्रमुख मुकेश दायमा, छञपती संभाजी महाराज प्रखंड मंञी अमित कुंभार, गोरक्षा प्रमुख प्रताप घोरपडे,धर्म रक्षा प्रमुख अनिल सातपुते, बजरंग दल अध्यक्ष रणजित पवार, सौ.स्मिता हंचनाळे, राजेश व्यास , विनायक सुतार, सागर घोरपडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व हिंदू प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.