You are currently viewing …..तर कोव्हीड कक्षाचे तालुक्यातील दुकान बंद करा – नासीर काझी कडाडले.

…..तर कोव्हीड कक्षाचे तालुक्यातील दुकान बंद करा – नासीर काझी कडाडले.

आरोग्य यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराविरोधात लवकरच छेडणार जनांदोलन….

वैभववाडी प्रतिनिधी :

वैभववाडी तालुक्यातील कोव्हीड कक्षाची अवस्था आंधळं दळतंय अनं कुत्र पिठ खातय.. अशी झाली आहे. या परिस्थितीला संबंधित आरोग्य प्रशासन जबाबदार आहे. कोव्हीड कक्षातील रुग्णांना यंत्रणेकडून जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे. कोरोनात रुग्ण सेवेची जबाबदारी सांभाळता येत नसेल तर कोव्हीड सेंटरचे दुकान बंद करा असे खडेबोल भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. कोव्हीड कक्षामधील कारभार न सुधारल्यास व रुग्णांच्या तक्रारी या पुढे आल्यास जनांदोलन अटळ आहे असा इशारा श्री. काझी यांनी दिला आहे.
सांगुळवाडी येथे कोव्हीड कक्षातील अनागोंदी कारभाराविरोधात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांना श्री काझी यांनी जाब विचारला. यावेळी सभापती अक्षता डाफळे, राजेंद्र राणे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल श्री काझी यांनी नाराजी व्यक्त केली. सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा काझी यांनी पाढा वाचला. रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधिकारी तपासणी न करता सोपस्कार पूर्ण करत आहेत. हे प्रकार थांबवा, रुग्णांना चांगली सेवा द्या, असे काझी यांनी ठणकावून सांगितले आहे.
फोटो – नासीर काझी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − one =