You are currently viewing पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संगीतकार गीतकार अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

पाडव्याला गुढी उभारु दारी बांधू तोरण
संकल्पाची घेऊ आण राम करील इच्छा पूर्ण।।धृ।।

सृष्टी निर्मिली ब्रह्मानं,रक्षिली वसुराजानं
चैत्र मासी वसंतात धरा जाई बहरुन
विश्वबंधुत्व जपावे रक्षावे पर्यावरण ll १ ll

तपस्या केली चेदिच्या राजा वसुनं
सृष्टी रक्षिण्या वसुला वर दिला इंद्रानं
देवाने दिल्या वेळूचे त्याने केले पूजन ।।२।।

संकल्प पूर्ण करण्याचा आज शुभदिन
राम राज्याभिषेक झाला वनवास संपून
नगरवासी बांधीती आनंदे गुढ्या तोरणं ।।३।।

अरुण गांगल कर्जत,रायगड महाराष्ट्र.
पिन 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा