You are currently viewing जीवन वाट

जीवन वाट

*लालित्य नक्षत्रवेल समूहाचे सदस्य लेखक कवी मकरंद दीक्षित लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जीवन वाट*

*जीवनाच्या रोपट्याला।*
*सुगंधीत फुल यावे।।*
*ओठातील शब्दांचे।*
*सुमधुर गीत व्हावे।।१।।*

*अंधारता दाही दिशा।*
*प्रकाशणारी वाट व्हावे।।*
*थिजलेल्या डोळ्यांच्या।*
*निरंजनातील वात व्हावे।।२।।*

*वादळाच्या लाटेमध्ये।*
*सोबत्यांची साथ व्हावे।।*
*तूटलेल्या, मोडलेल्या।*
*दुर्बलांचा हात व्हावे।।३।।*

*भेगाळल्या भूमीसाठी।*
*खळाळता पाट व्हावे।।*
*सुकलेल्या रोपट्यांचे।*
*छान हिरवे शेत व्हावे।।४।।*

*जळो काळजी,काजळी।*
*सारे सुंदर, शुभ्र-श्व़ेत व्हावे।।*
*तृप्त व्हावी भूक माझी।*
*अन् वासनांचे प्रेत व्हावे।।५।*

*रचना: मकरंद दीक्षित, कात्रज,पुणे*
*9049811976*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =