You are currently viewing अखिल म.प्रा.शि.संघ व गोडकर कुटुंबीय आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

अखिल म.प्रा.शि.संघ व गोडकर कुटुंबीय आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सावंतवाडी
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी व संघटनेचे माजी मार्गदर्शक तसेच स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ मार्गदर्शक गुरुवर्य कै. दशरथ दत्ताराम गोडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे कुटुंबीय यांच्यामार्फत स्कॉलर ऑफ सावंतवाडी ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या प्रथम दहा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे साहेब, सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, पंचम खेमराज कॉलेजचे प्राचार्य भारमल सर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल. देसाई , अखिल संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री राजा कविटकर जिल्हा सरचिटणीस श्री. बाबाजी झेंडे तालुकाध्यक्ष श्री. संजय शेडगे महिला सेल अध्यक्षा श्रीम. वंदना सावंत ,सचिव तेजस्विता वेंगुर्लेकर, जिल्हा महिला सेल सचिव श्रीम. सीमा पंडित महिला आघाडी प्रमूख श्रीम. श्रावणी सावंत तसेच गोडकर कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री मांजरेकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर कै. श्री गोडकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री गुरु राऊळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी कै.गोडकर गुरुजींच्या कार्याचा आढावा सांगितला. शिष्यवृत्ती परीक्षा, ज्ञानी मी होणार परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी चमकवणारे गोडकर गुरुजी अनेक शिक्षकांचे प्रेरणास्थान होते शालेय विध्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्याची चिकाटी त्यांच्या अंगी होती. विध्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत क्रमांक पटकावित हीच त्यांच्या कार्याची ओळख होती. असे वक्तव्य त्यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थी व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील टॉप टेन विद्यार्थी यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र व सुपारी रोपटे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी गुणगौरव सोहळया नंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कै. गोडकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेऊन गोडकर कुटुंबियांनी समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.तसेच अंतिम परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री म.ल.देसाई सर यांनी गोडकर गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत गोडकर गुरुजीं सारख्या महनीय व्यक्तींमुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाला एक उंची प्राप्त झाली आहे असे वक्तव्य केले.अध्यक्ष श्री.यूवराज खेमसावंत यांनी संघटनेचे वगोडकर कुटुंबाचे कौतूक करून आपण स्पर्धा परीक्षा केंद्र,पंचम खेमराज मध्ये सुरू करणेचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दिलीप गोडकर सरांनी, उपस्थित मान्यवर, शिक्षक पालक व विद्यार्थी यांचे शब्द सुमनाने आभार मानले.


अखिल संघाच्या वतीने श्री. अमोल पाटील श्री. दीपक राऊळ श्री सुभाष सावंत श्री. नरेंद्र सावंत श्री. प्रमोद पावसकर,संदिप गवस,श्रीकांत आजगावकर, श्री. महेश सावंत श्रीम श्रेया परब ,वंदना दाभोलकर,श्री. बापूशेट कोरगावकर सर श्री. विजय देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा