जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम होणार..

जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम होणार..

सिंधुदुर्ग :

16 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्ह्यातील नवोदित वकिलांना सनद प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य अॅड.‌ संग्राम देसाई आणि सिंधुदुर्ग बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले व सध्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या न्यायी अधिकाऱ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा तसेच वकिली व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांना यावेळी सनद प्रधान केली जाणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष वकील सतिष देशमुख उपस्थित राहणार आहे.

जिल्ह्यात प्रथमच हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 16, न्यायाधीशांचा सत्कार या दिवशी करण्यात येणार आहे. यावेळी मल्टीपर्पज पतसंस्थेच्या शाखेचेही उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी अॅड. सर्वश्री अमोल मालवणकर, उमेश सावंत, अमोल सामंत, अनिल केसरकर, प्रथमेश नाईक, सुहास साटम, कंगराळकर, लक्ष्मण बाक्रे, विवेक मांडकुंलकर, आनंद गवंडे, शार्दुल पिंगुळकर आदी उपस्थित होणार आहे. शरद कृषी भवन येथे हा कार्यक्रम 16 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा