You are currently viewing कणकवली येथे उद्या हिंदु नववर्ष स्वागत यात्रा

कणकवली येथे उद्या हिंदु नववर्ष स्वागत यात्रा

कणकवली

कणकवली शहरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीने २ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता ‘ हिंदु नववर्ष स्वागत यात्रे’चे आयोजन केले आहे. या स्वागत यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार आहे.

या स्वागत यात्रेत रथारूढ भारतमाता, वारकरी दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज, सजवलेल्या बैलगाडया, ढोलपथक, ध्वजपथक, लेझीम पथक, वेगवेगळी रूपे धारण केलेली लहान मुले-मुली, वेगवेगळे ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेले कलाकार, तसेच नागरिक आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. या यात्रेत हिंदू धर्म व संस्कृती यांचा सुरेख संगम पहायला मिळणार आहे. तसेच यात्रेत सर्वजण जात-पात, पंथ-संप्रदाय, प्रांतवाद, भाषावाद व पक्ष हे सर्व बाजूला ठेवून सकल हिंदु समाजाचा एक घटक म्हणून सहभागी होणार आहेत. हिंदू धर्मातील श्रेष्ठ रूढी व परंपरांना विज्ञानाचा आधार आहे, त्या पुढच्या तरुण पीढीला माहिती व्हाव्यात, त्यांनी त्यांची जोपासना करावी.
महान हिंदु संस्कृतीचा त्यांच्या मनात आदर निर्माण व्हावा यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच यात्रेचा समारोप प्रसिद्ध वक्ते डॉ. संतोष निंबाळकर हे ‘आपली पुरातन हिंदु संस्कृती, तिचे महत्व आणि जपणूक ‘ या विषयाने करणार आहेत. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु होऊन अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून बाजारपेठ मार्गे ढालकाठीकडून कणकवली महाविद्यालयासमोरील शिवारा मंदिर येथे समारोप होईल. नागरिकांनी आपल्या परिवारासह या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीने केले आहे. दरम्यान, या स्वागत यात्रेचे नियोजन गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले. फोटो ओळ – कणकवली येथे हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने आयोजित बैठकीत अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा