जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
हाय कसली रुक्ष प्रिती
आय लव्ह यू बोलणे
गाडी वरी वा गाडीत बसुनी
नुसतेच कोठे हिंडणे
पूर्वी कसे पण छान होते
बोलल्या विण समजणे
नजरेस केंव्हा नजर भिडता
पांपण्या ही झुकविणे
हातात घेवुन हात आतां
रस्त्या वरी ही झळकणे
बार रेस्टोरंट मध्ये रमुनी
भावनांना जे उधळणे
नशिबी नसे यां वाळूतले
उगिच रेषांच तेे बहाणे
लाजर्या ओठांतले क्षणी
उमजणे सारे उखाणे
बहरती मधुचंद्र यांचे जणु
सेल्फीतल्या चित्रां प्रमाणे
कमरेस केमेरा वसे अन्
हातात ओझे दीन वाणे
चंद्र आम्हा साक्षिला तो
मधु रूप सखिचे देखणे
चित्राहुनी सुंदर खरे त्या
नजरेत फुलले चांदणे
स्पर्शातली जादू कशी ती
अंगी शहारे जीवघेणे
विसरुनी नकळत स्वत:ला
वेगळ्या विश्वात जगणे
वाटते तरि सांगून जावे
राहो न बाकी कांही उणे
य पिढिचे त्या पिढिला
चुकते करावे आज देणे
गुंतुनी व्यवहारी जगाच्या
वाया न क्षण हे सांडणे
प्रेम ईश्वर मूर्तिमंत च
पूजा ही अंतरी मांडणे
घेई हेच नक्षत्रांचेच देणे
अरविंद