You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” अंतर्गत सुदरुढ मुलांना प्रमाणपत्राचे वाटप

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” अंतर्गत सुदरुढ मुलांना प्रमाणपत्राचे वाटप

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील तीन अंगणवाडीतील सुदरुढ बालकांना शिवाजी प्रागतिक शाळा, कॅम्प येथे प्रमाणपत्र वितरण

आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून व महाराष्ट्राचे लोकनेते मा. देवेन्द्र फडणवीस विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र राज्य, मा.चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” संपूर्ण राज्यात दिनांक 21 मार्च ते 27 मार्च 2022 या दरम्यान जिल्ह्याच्या व मंडलाच्या अंगणवाडी व बुथ स्तरावर यशस्वीपणे राबवायचे असल्याने त्याचा शुभारंभ कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली व वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांच्या उपस्थितीत संपंन्न झाला.
खरतर केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान अंतर्गत ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” हे संपूर्ण देशात २१ मार्च ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करावे असे सर्व राज्याला कळवीले होते, परंतु महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना चे कारण सांगून अभियानच रद्द केले. म्हणूनच सदर अभियान भाजपा च्या वतीने घेण्यात आले असे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण म्हणाले की ० ते ६ वर्षा मधील मुलांची उंची, वजन व वय या निकषांवर स्वस्थ बालकांना प्रमाणपत्र व ‘POSHAN APP’ द्वारे नोंद केली जाणार आहे. जेणेकरून कुपोषित बालकांना केंद्र सरकार कडून सकस आहार पुरविण्यासाठी मदत होईल.
यावेळी या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक एस्. एस्. काळे सर, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष जगताप, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर, महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले, रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व आकांक्षा परब, हळदणकर, भुषण जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अंगणवाडी सेविका स्मिता कोनेकर – सुनीता कांबळे – नयना आरेकर तसेच पालक – पुजा सावंत, रुचीरा दाटेकर, तृप्ती माणगांवकर, नेहा गवस, दर्शना मोरजकर, गजानन वेर्णेकर, आचल डांगरेजा, गायत्री जगताप, मंजिरी मोरे, माधवी जगताप, प्रणाली पार्सेकर, साधना मिसाळ इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा