You are currently viewing राज्य पातळीवरील भातपीक स्पर्धेत वेंगुर्ले केळूस गावचे शेतकरी लक्ष्मण वराडकर राज्यात प्रथम…

राज्य पातळीवरील भातपीक स्पर्धेत वेंगुर्ले केळूस गावचे शेतकरी लक्ष्मण वराडकर राज्यात प्रथम…

कृषी विभागातर्फे स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ले
कृषी विभागाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील खरीप भातपीक सर्वसाधारण गट २०१९-२० स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले केळूस गावचे सुपूत्र प्रगतशील शेतकरी लक्ष्मण अनंत वराडकर हे राज्यात प्रथम आले आहेत.

कृषी विभागाने राज्य पातळीवरील खरीप भात सर्वसाधारण गट २०१९-२० ही स्पर्धा घेतली होती. लक्ष्मण वराडकर यांनी राज्यस्तरीय भात पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यात त्यांनी हेक्टरी १२६ क्विंटल ७ किलो भात पिकाचे उत्पादन घेतल्याने ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केळूस गावचे माजी सरपंच योगेश कृष्णा शेट्ये व मित्र मंडळीनी लक्ष्मण वराडकर व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 15 =