You are currently viewing साथ दे तू मला

साथ दे तू मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

स्वप्नातील ते दिवस प्रेमाचे मज आठवले
आठवांच्या कोंदणात मी हळुवार बसवले

सागरतीरी छेडत होता तुज खट्याळ वारा
फडफड करती बटा केसांच्या नव्हता थारा

आतुर मिलना धावुनी लाटा येती किनारी
कवेत घेतो लाटा किनारा ते दृश्य मनोहारी

सांज होता दर्याच्या पाण्यात रवी डुबला
रंग तांबडा देऊनी पाण्या मिठीत शिरला

पाहुनी मिलन अधर हळूच अधरांस भेटले
अशीच साथ दे तू मला मन सांगुनी गेले

प्रेमाच्या घेऊनी आणाभाका प्रेमच थकले
चंचल मन ते तुझे नि माझे तिथेच फसले

हाती घेतला हात तुझा तो मी जीवनभर
जिवनसाथी बनविले प्रेमाच्या विश्वासावर

©【दिपी】🖋️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + eighteen =