You are currently viewing सिंधुदुर्गात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस..

सिंधुदुर्गात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस..

आंबा, काजू बागायतदार अडचणीत..

सिंधुदुर्ग

जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. सह्याद्रीच्या पट्ट्यात तुफान अवकाळी पाऊस कोसळला. बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून वादळी वारे आणि नंतर जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील सर्वच भागात हा अवकाळी पाऊस लागल्याने आंबा आणि काजू बागायतदार अडचणीत येणार आहेत.

गेले काही दिवस हवामानात मोठा उष्मा निर्माण झाला होता. मात्र या अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा गारवा निर्माण झाला आहे. विजांचा कडकडाट सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्य लोक आणि व्यापाऱ्यांचे मात्र हाल झाले.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + three =