You are currently viewing रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांची महत्वपूर्ण २५ मार्च ला बैठक…

रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांची महत्वपूर्ण २५ मार्च ला बैठक…

कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटना यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते परवानाधारक यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ येथील मराठा हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील, राज्य संघटना उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, राज्य सचिव चंद्रकांत यादव, आयटी सेल प्रमुख कौस्तुभ जोशी, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रुपेश पेडणेकर उपाध्यक्ष कान्होबा देसाई, जिल्हा सल्लागार कमलाकांत कुबल आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. ई pos मशीनद्वारे विक्री करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत व इतर समस्यांविषयी यावेळी चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत ई pos मशीनला नेट ची सुविधा दुकानात उपलब्ध करून देणे, ई pos मशीन मधील डाटा सुधारून मिळाला पाहिजे. जिल्ह्यामध्ये नवीन सुधारित इष्टांक वाढवून मिळण्याबाबत, दुकानदारांकडून चुकीच्या पद्धतीने धान्य खरेदी करून घेत असल्याबाबत, पीएमजीकेवाय योजनेचे धान्य वाटप केल्याचे कमिशन मिळण्याबाबत यावेळी चर्चा होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा