You are currently viewing पाळये गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्याने गेला वाहून

पाळये गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्याने गेला वाहून

तात्काळ उपाययोजना करण्याच्या जि. प.सभापती डॉ.अनिषा दळवी सुचना

दोडामार्ग

तिलारी मुख्य रस्त्यापासून पाळये गावाला जोडणारा पूल गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्याने वाहून गेला त्यामुळे गुरुवार रात्रीपासून पाळये गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.गावातून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोडामार्ग तिलारी रस्त्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या पाळये पुलाची आज सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्हा परीषद शाखा अभियंता श्री.पवार यांचे सह अनामिका जाधव,कल्याणकर यांनी पहाणी केली व पाउस कमी होताच ग्रामस्थांची सोय होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या.यावेळी राजेंद्र निंबाळकर,शैलेश दळवी,स्वप्नील निंबाळकर,कोनाळ सरपंच पराशर सावंत, मणेरी सरपंच विशांत तळावडेकर,प्रशांत दळवी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =