You are currently viewing मालवण येथे डंपर-दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात  कर्नाटकातील दोघे युवक गंभीर जखमी

मालवण येथे डंपर-दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात  कर्नाटकातील दोघे युवक गंभीर जखमी

मालवण

डंपर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कर्नाटकातील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळच्या सुमारास मालवण-कसाल मार्गावर आनंदव्हाळ परिसरात घडला. ओंकार येडूरे व विनायक येडूरे (रा. चिकोडी), अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान त्यांना तात्काळ उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त डंपर हाफ मालवण येथून चौकेच्या दिशेने जात होता. यावेळी मालवणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. यात एकाच्या पायाला तर दुसऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली. जखमींना स्थानिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अधिक तपास मालवण पोलिस ठाण्याचे पो.काँ.सुभाष शिवगण व पो,काँ.जानकर करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा