वैभववाडी
पुण्यातील अठ्यान्नव वर्षांच्या कार्यसाधनेची परंपरा असलेल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक व दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांना काशी केशव दासबोध पुरस्कार देण्यात आला.
संस्थेच्या बुधवार पेठेतील श्री. एकनाथ मंगल कार्यालयामध्ये अध्यक्ष सु.व्यं. धायगुडे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची प्रतिमा ,ग्रंथ व रोख रक्कम देऊन विजय लाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. सूत्रसंचलन सुनिल पारखी यांनी तर आभार प्रकटीकरण अनिल पानसे यांनी केले.