You are currently viewing आचरा समुद्रात उधाणामुळे होडी उलटून तीन मच्छीमार समुद्रात फेकले गेले

आचरा समुद्रात उधाणामुळे होडी उलटून तीन मच्छीमार समुद्रात फेकले गेले

स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप काढले बाहेर

मालवण

समुद्रात आलेल्या उधाणामुळे जाळी होडीच्या पंख्याला अडकल्यामुळे आचरा समुद्रात पुजा नामक पात बुडाली. यावेळी आत असलेले तिघे मच्छीमार बाहेर फेकले गेले. मात्र ते सुदैवाने बचावले. यात पातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आचरा समुद्रात घडली.

आचरा पिरावाडी येथील मच्छिमार विदेश नारायण कुमठेकर,आदित्य बापू धुरी, वैभव कुमठेकर हे आपली पूजा पात घेऊन मच्छिमारी साठी गेले होते. मुणगे तालुका देवगड बाजूने मासेमारी करत असताना अकस्मात समुद्राला आलेल्या उधाणामुळे मासेमारी साठी समुद्रात टाकलेली जाळी होडीच्या इंजिनच्या पंख्याला अडकून इंजिन बंद पडल्याने होडी मुणगे आडबंदर मोबार धाकटे केवूंडले येथील खडकाळ भागात दगडांवर आपटल्याने झालेल्या दुर्घटनेत होडीतील तिघेही बाहेर फेकले गेले. खडकांच्या आधारामुळे सुदैवाने होडीतील तिघेही बचावले. सदर दुर्घटनेची माहिती समुद्रात मच्छिमारी करणारे लियाकत मुजावर यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर, सकलेन मुजावर आदींना फोन करुन सांगितल्यावर आचरा पिरावाडी येथील सकलेनमुजावर , आदिल मुजावर,, राजू मुजावर,साहिल मुजावर,मुझफ्फर मुजावर,दिनकर कुबल, बुधाजी पाटील,दर्शन तारी झहिर मुजावर रशिक जोशी हिमांशु पाटील,सचिन सारंग,दिलिप तोडणकर,यांसह अन्य मच्छिमार गाडीने आडबंदर येथे जात खडकात अडकलेल्या मच्छिमारांना सुखरूप आचरा येथे घेऊन आले घटनेची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस नाईक परब,जगताप, मनोज पुजारे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस,अनिल करंजे, पाडूरंग वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा