सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनते साठी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आले. तसेच एकीकडे कुडाळ मालवणचे आमदार सांगतात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अत्यंत चांगल्या सुविधा देत आहेत.आणि त्यांचेच ओरोस मधील विभागीय पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पावलावर पाऊल ठेवून सामान्य जनतेसाठी मदत केंद्र उभारतात याचे नेमके गौडबंगाल काय? मनसेची धास्ती घेतली का शिवसेनेने? की मनसे कडे तक्रार आल्यानंतर यांची पितळी उघड होतील म्हणून हा केविलवाणा खटाटोप. आता तरी कुडाळ मालवण चे आमदार, पालकमंत्री आणि खासदार अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास मान्य करून त्यामध्ये सुधारणा करावी.
तसेच काल कुडाळ तालुका शिवसेनेने खड्ड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन केले तशाच प्रकारचे आंदोलन पूर्ण जिल्ह्यामध्ये करण्याची गरज आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना जागण्यासाठी आवाज उठवतच आहोत. यांच्याकडे सत्ता असताना यांना अशी आंदोलने करावी लागतात हे दुर्दैव जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही हे प्रश्न हाताळू असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी स्पष्ट केले.