You are currently viewing श्री तुकाराम बिजेच्या सर्वांना शुभेच्छा!

श्री तुकाराम बिजेच्या सर्वांना शुभेच्छा!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी,गायक, संगीतकार श्री अरुण गांगल यांची तुकाराम बीजेच्या निमित्ताने लिहिलेली काव्यरचना

तुकाराम अलौकिक शब्दांतीत संत
जगद्गुरुनी सदा जपले जनहित।।ध्रु।।

रचिले हजारो अभंग जे अजरामर
मोद होई वाचता त्यांची गाथा निरंतर
सर्वस्व त्यजिले राहिले विठ्ठल भक्त।।1।।

संसार केला परि ते राहिले अलिप्त
शिवबांसह सर्व जनांना उपदेशीत
मनाने राहिले निष्काम संतृप्त शांत।।2।।

तुकोबांची आगळी भक्ती विरळी विरक्ती
ज्यांचे घरी धन शब्दांची रत्ने संपत्ती
रंजले गांजलेल्यांना व आप्त।।3।।

अणुहून लहान आकाशाहून महान
शिकवती भक्तीच्या वाटा केले सुजाण
वंदू त्यांचे चरण वैकुंठी गेले सदेहात।।4।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410 201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =