कोरोना पुराण
कधी थांबेल आता
हे कोरोनाचे तांडव.
सुने पडले रस्ते,वाडे,
मोडून पडले मांडव.
सर्दी ताप आला तरी,
भीतीने अंथरून धरतात.
लक्षणे नसताना काही,
घाबरूनच लोक मरतात.
खबरदारी घ्या म्हणून,
बोंबलून सरकार सांगतंय.
स्वतःवर वेळ येत नाही तोवरी,
ऐकू कोणाला जातंय.
आयुर्वेदिक औषधांचा मारा,
सोशल मीडियावर पडतो.
वाफ,काढा,गरम पाणी घेतो,
तोच एकटा कोरोनाला नडतो.
मास्क सॅनिटायझर अंतर,
नियम पाळणे गरजेचे आहे.
विषाणू संसर्गाला स्वतःपासून,
दूर सारणे गरजेचे आहे.
इस्पितळात नाही उरल्या,
खाटा रुग्ण झोपवायला.
कठीण होतंय घरच्यांना,
गेलेल्याचं दुःख पचवायला.
फाजील विश्वास माणसाला,
माणसांपासून दूर करतो.
कोरोनाने जीव जातो तेव्हा,
स्मशानातही एकटाच उरतो.
अजून किती जीव असे,
देवा कोरोनाने दम तोडणार.
तूच काहीतरी करशील तेव्हा,
माणसाचा देवावर विश्वास बसणार.
उरली नाही आशा लवकर,
कोरोनावर लस येण्याची.
युक्ती तर नाही ना ही,
लोकसंख्या कमी करण्याची??
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६