भाजीवाली

भाजीवाली

मुळा मेथी पालक,
आहे माझी पालेभाजी,
भूक तुमची भागविण्या,
आली दारावर ताजी.

टोमॅटो आहेत लाल,
जसे गोबरे गुलाबी गाल.
गोडी त्यांची कळेल तुम्हा,
जेव्हा आवडीने तुम्ही खाल.

आले लसूण मिरची,
सोबत हिरवी कोथंबीर.
सर्वकाही मिळेल हाती,
फक्त धरा थोडा धीर.

लाल माठ कोवळा,
थोडा चवीने खायचा.
गर्मीच्या दिवसात त्याचा,
थोडा थंडावा घ्यायचा.

भेंडी पडवळ दोडका,
चार दिवसही टिकतात.
म्हणून तर भाजीवाले,
थोडे महाग विकतात.

ढबू मिरची मटार घ्या,
करा पावभाजी छान.
बटाटेही घ्या किलोभर,
त्यांना पावभाजीत मान.

संकट असता डोईवर,
आली भाजीवाली दारी.
रोज रोज येत नसते,
माझी रुबाबदार स्वारी.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा