You are currently viewing कबूलायतदार प्रश्नी आंबोली, गेळे ग्रामस्थांचे उद्या प्रांत कार्यालयासमोर धरणे…

कबूलायतदार प्रश्नी आंबोली, गेळे ग्रामस्थांचे उद्या प्रांत कार्यालयासमोर धरणे…

आंबोली

येथील कबूलायतदार गावकर जमीन प्रश्नी उद्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत येथील माऊली मंदिरात आज गावकऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी प्रमुख गावकर शशिकांत गावडे, श्रीकांत गावडे, उल्हास गावडे, विलास गावडे, प्रकाश गावडे, सरपंच गजानन पालेकर, रामचन्द्र गावडे आदी उपस्थित होते.

यासंदर्भात गावात दवंडी देण्यात येणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वन जमीन आणि खाजगी वने काढून टाकण्यात यावे. यासंबंधी सविस्तर माहिती वनच्या वरिष्ठ पातळीवर बैठक करून महसूल जमीन आणि वन जमीन एकत्रित मूळ जमीन वरचे काबुलयातदर नोंदणी काढून प्रश्न सोडवून जमीन वाटप व्हावे. यासाठी विधिमंडळाने कार्यवाही करावी, यासंबंधीचा निर्णय सरकारने घ्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + sixteen =