You are currently viewing वेंगुर्ले – पणजी एस् टी ची फेरी सुरु करा , अन्यथा आंदोलन – भाजपा चा इशारा

वेंगुर्ले – पणजी एस् टी ची फेरी सुरु करा , अन्यथा आंदोलन – भाजपा चा इशारा

वेंगुर्ले

वेंगुर्ले आगाराची पणजी ( गोवा ) एस्. टी.ची फेरी येत्या आठ दिवसात सुरु करावी अन्यथा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांना भाजपा शिष्टमंडळाने दिला .
कोवीडच्या काळापासुन अनियमित असलेली पणजी फेरी ही एस्. टी.कर्मचारी संपापासुन पुर्ण पणे बंद आहे . त्यामुळे नोकरदार वर्ग , शाळा काॅलेज मध्ये जाणारे विद्यार्थी , गोवा राज्यात जाणारे रुग्ण यांना अडचणींचा सामना करावा लागतो . तसेच सदर एस्. टी.चा फायदा उभादांडा – मोचेमाड -आरवली – शिरोडा – आजगाव – मळेवाड – सातार्डा येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना पण होतो .त्यामुळे सर्वांचे हाल होत आहेत .
सद्यस्थीतीत एस्. टी.चे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत , त्यामुळे आता एस्. टी.ची सेवा हळुहळु सुरु झाली आहे . परंतु अजून पर्यंत भारमान देणारी पणजी फेरी सुरु करण्यात आलेली नाही , त्यामुळे एस्. टी.महामंडळाचेही नुकसान होत आहे . म्हणून येत्या आठ दिवसात ही फेरी सुरु न केल्यास भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा आगार व्यवस्थापक वारंग यांना देण्यात आला .
*भाजपा च्या निवेदनाची दखल* —- भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन दिल्यावर ताबडतोब आगार व्यवस्थापकांनी वरीष्ठांशी चर्चा करुन बुधवार पासुन पणजी साठी सकाळी ६ = ३० व दुपारी २ = ४५ अशा पुर्वी प्रमाणे दोन फेरया सुरु करण्याचे अभिवचन दिले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे – श्रेया मयेकर , ता.चिटनीस जयंत मोंडकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , आय. टी.सेलचे केशव नवाथे , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , ओंकार चव्हाण , वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर , युवा मोर्चा चे भुषण सारंग , संतोष खानोलकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा