You are currently viewing मुदतवाढ मिळेल का?…. निधी अभावी बिल पेंडीग

मुदतवाढ मिळेल का?…. निधी अभावी बिल पेंडीग

शासकीय ठेकेदार आर्थिक अडचणीत

 

जागतिक अस्थिरतेमुळे, कच्चा मालाचा पुरवठा खंडित झाला. त्यामूळे बांधकाम साहित्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने नवीन बांधकाम उद्योजक मोठया प्रमाणात अडचणीत आला आहे.

शासकीय ठेकेदार सध्या वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षात कोविड 19 प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व अडचणींचा सामना करत विकासकामे पूर्ण करून देखील अद्याप काही योजनाचे निधी शासनाकडे प्राप्त न झाल्यामुळे देयकच मिळण्याबाबत अनिश्चितता असताना अशाही परिस्थितीत व्यवसायात तग धरून राहण्याचा प्रयत्न सात्यत्याने करत आहे.

सध्या मार्केट रेट व अंदाजपत्रकातील दर याच्यातील तफवात शेकडा २० पर्यंत वाढली आहे. (उदा. स्टील, सिमेंट, पिव्हिसी पाईप,अल्युमिनियम, काच, डांबर इत्यादी ) अशा परिस्थितीत चालू आर्थिक वर्षात मार्च २०२२ आर्थिक भुर्दंड सहन करून काम पूर्ण जरी केले सद्याच्या जि. प. देयकाचा प्राप्त होण्याच्या प्रणालीमुळे रक्कम मिळणे अशक्य दिसून येते. तसेच चालू महिन्यात झालेल्या कामाच्या निविदा पैकी सर्वच कामे पूर्ण करण्याचा कालावधी ३१ मार्च आहे. अद्याप काही कामांचे कार्यारंभ आदेश देखील झालेले नाहीत. अशा परिस्तिथीत कामे कशी पूर्ण करावी? काही विभागाच्या कामांना मुदत वाढ मिळेल का? ३१ मार्च पर्यंत काम जरी पूर्ण झाले देयकाची रक्कम आपल्याला त्यापुढे मिळेल का? असे विविध प्रश्न आज नवीन ठेकेदारांना सतावत आहेत. यासाठी आपण सर्वजण संघटित होऊन उपाय शोधणे गरजेचे आहे. या एकंदर परिस्थितीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन अमित गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + six =