You are currently viewing पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने सावंतवाडी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने सावंतवाडी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल

राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव तथा परीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा सावंतवाडी नगरपालिकेवर फडकवण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा विचार सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस संघटक सचिव तथा परीक्षक शेखर माने यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केला आहे.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सावंतवाडी येथे आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी करा. महाविकास आघाडीबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे मत मांडले आहे. यावेळी त्यांचे माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी शहरात स्वागत केले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, सांगलीचे नगरसेवक प्रदीप कांबळे, भास्कर विभुते, मनोज वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा